चांद्रयान वेगाने चंद्राच्या जवळ जात असून चंद्रापासून अवघ्या काही अंतरावर यांन पोहचले आहे.
चांद्रयान ३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. लँडर चांद्रयान-३ पासून विलग झाल्यानंतर चंद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे. इस्रोने शुक्रवारी पहिल्या डिबूस्टिंग प्रक्रियेद्वारे विक्रम लँडरची कक्षा कमी केली आहे. डीबूस्टिंग प्रक्रिया म्हणजे कोणत्याही वाहनाचा वेग कमी करणे. इस्रोने यासाठी खास तंत्र अवलंबले आहे.
इस्रो आज रात्री 2 वाजता डीबूस्टिंगद्वारे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ आणेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यानाचा वेग पुन्हा कमी करण्यात येईल. यानंतर, चंद्रापासून विक्रम लँडरचे किमान अंतर ३० किमी आणि कमाल अंतर १०० किमी असेल. या सर्वात कमी अंतरावरून २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार आहे.
(हेही वाचा : Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी स्वीकारली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी)
२३ ऑगस्टला लँडिंगमध्ये अडचण आल्यास महिनाभरानंतर पुन्हा प्रयत्न केला जाईल. कारण चांद्रयान-3 ला दुसऱ्या सकाळची वाट पाहावी लागणार आहे, जी २८दिवसांनंतर येईल.
हेही पहा:
Join Our WhatsApp Community