पुण्यातील भूगाव येथील मॉन्टव्हर्ट बेलार सोसायटीमध्ये यंदा चंद्रयान मोहिमेवर (Chandrayaan Mission Scene) आधारित देखावा साकारण्यात आला आहे. इस्त्रोची चंद्रयान-३ मोहीम ही आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे. दरवर्षी प्रचलित आणि वैशिष्ट्यपूर्ण देखावा तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे ही सजावट करणाऱ्या वरदा बोडस यांनी सांगितले.
यावर्षी सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात चंद्रयान मोहिमेसंदर्भातील देखावा (Chandrayaan Mission Scene) तयार करण्याचा विचार आला. विशेष म्हणजे इकोफ्रेंडली देखावा तयार करण्यावर आमचा भर असतो. त्यामुळे चंद्रयान मोहिमेचा देखावाही प्लास्टिकचा वापर न करता फक्त कार्डबोर्ड, कागद, लाकडी तुकडे, कापूस तसेच विजेच्या दिव्यांचा वापर करून तयार करण्यात आला असल्याची माहिती वरदा बोडस यांनी दिली.
या संकल्पनेविषयी त्या म्हणाल्या की, यासंदर्भातील एक व्हिडियो युट्युबवर पाहिला होता. त्यानुसार, चंद्रयानाचा देखावा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गणपती दर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही आम्ही तयार केलेला देखावा खूपच आवडला. सगळ्यांनी गणपती मूर्तीबरोबर विविध रिल्स तयार करून सोशल मिडियावर पोस्ट केल्या आहेत. आमच्या सोसायटीतील बऱ्याच जणांनी देखावा (Chandrayaan Mission Scene) आणि गणपती बाप्पासोबत काढलेला डीपी व्हॉट्सअॅपवर ठेवला आहे. यावरून देखावा आवडल्याचं लक्षात येतं, बऱ्याच जणांनी आम्हाला प्रोत्साहनही दिलं.
(हेही वाचा-BMC : मुंबई महापालिका रविवारी आयुक्तांविना)
सोसायटीतील अमेय निसळ यांनी चंद्राची कलाकृती, तर वरदा बोडस यांनी रॉकेटची कलाकृती साकारली असून त्यांच्यासोबत दिपा जोशी, खालकर दाम्पत्य, पल्लवी पुजारी, अक्षता नाडकर्णी यांनी देखावा साकारण्याकरिता मेहनत घेतली.
खूपच कमी साहित्यात संपूर्ण देखावा तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे तो पूर्ण झाल्यानंतर आम्ही इतकी कठीण कलाकृती साकारू शकलो, यावर विश्वासच बसत नाही. देखाव्यासोबत प्रत्यक्ष गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर देखावा जिवंत झाल्यासारखा वाटला. कापसाऐवजी खरा धूर येतोय आणि आता रॉकेट उडणार आहे, असेच आम्हाला वाटले, अशा शब्दात आपल्या भावना दिपा बोडस यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community