Chandrayan-3: लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर तरी कोण पुरवत आहे इस्रोला माहिती

शेप उपकरण हे चंद्रासोबतच सौरमालेच्या बाहेर असणाऱ्या एक्झोप्लॅनेट्सचा देखील अभ्यास करणार आहे.

184
Chandrayan-3: लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर तरी कोण पुरवत आहे इस्रोला माहिती
Chandrayan-3: लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर तरी कोण पुरवत आहे इस्रोला माहिती

चंद्रयान -3 मोहीम उत्कृष्टरीत्या पार पडल्यानंतर सगळीकडेच या मोहिमेचे कौतुक होत आहे. १४ दिवसांची मोहीम संपल्यानंतर चंद्रयान -3 (Chandrayan-3) मधील लँडर आणि रोव्हर हे स्लीप मोडवर गेले होते. मात्र असे असले तरी स्पेक्ट्रो-पॉलॅरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) असं नाव असलेले उपकरण गेले ५२ दिवस इस्रो ला माहिती देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत आहे.

स्पेक्ट्रो-पॉलॅरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट (SHAPE) चंद्रयान -3च्या प्रॉपल्शन मॉड्यूलमध्ये बसवण्यात आले आहे. लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरल्यानंतर प्रॉपल्शन मॉड्यूलने चंद्राभोवती फिरण्यास सुरुवात केली होती. शेप उपकरण हे चंद्रासोबतच सौरमालेच्या बाहेर असणाऱ्या एक्झोप्लॅनेट्सचा देखील अभ्यास करणार आहे. जीवसृष्टीच्या विकासासाठी पृथ्वीची जी वैशिष्ट्यं आहेत, तशाच प्रकारची वैशिष्ट्यं असणारा एक्झोप्लॅनेट शोधण्यासाठी याची मदत होणार आहे. आतापर्यंत या उपकरणाने पुरेशी माहिती पाठवली असून, आणखीही कित्येक दिवस हे कार्यरत राहील, असं इस्रोने स्पष्ट केलं. (Chandrayan-3)

(हेही वाचा : Mumbai Local : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; लोकलची स्थिती काय ?)

अशा प्रकारे काम करणार शेप उपकरण
शेप हे उपकरण केवळ काही वेळच कार्यरत राहतं. याला कारण म्हणजे, जोपर्यंत ते पृथ्वीवरून स्पष्टपणे दिसत नाही, तोपर्यंत ते वापरता येत नाही. हे उपकरण अशा प्रकारचा डेटा गोळा करत आहे, जो काळानुसार बदलणार नाही. म्हणजेच, एखाद्या एक्झोप्लॅनेटची जी माहिती शेपने दिली आहे, ती आणखी काही वर्षांनंतर देखील लागू होईल.” असं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी अधिक माहिती देताना सांगितले. या पेलोडने अपेक्षित होता तेवढा डेटा पाठवला आहे. आणखी काही दिवस याचं काम सुरू राहील. मिळालेल्या डेटाचं अ‍ॅनालिसिस करायला आणखी काही महिने लागतील. त्यानंतरच त्यातून जर काही नवीन शोध लागला असेल, तर त्याबाबत घोषणा केली जाईल.” असंही सोमनाथ माध्यमांशी संवाद साधताना यांनी सांगितलं.

(हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.