चंद्रयान ३ चे चंद्रावर आज सॉफ्ट लँडिंग झाले. देशवासीय या क्षणाचे live साक्षीदार झाले. पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून हा क्षण live पाहिला. चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला.
दक्षिण ध्रुवावर तिरंगा
भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला पहिला देश ठरला आहे. भारताच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा पाहण्यास मिळतो आहे. कारण भारताचे चंद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. भारताचा झेंडा आता तिथे पाहण्यास मिळत आहे. इस्रोला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. चंद्रयान ३ च्या लँडरने आत्तापर्यंत २१ वेळा पृथ्वीची आणि १२० वेळा चंद्राची प्रदक्षिणा केली आहे. आतापर्यंत ५५ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.
Chandrayaan-3 Mission:
‘India🇮🇳,
I reached my destination
and you too!’
: Chandrayaan-3Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023