विदर्भातील वाढत्या मानव-वाघ संघर्षावर उपाय म्हणून पाच वाघिंणीना रेडिओ कॉलर लावून नव्या जंगलात पाठवले जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दोन अडीच वर्षांच्या वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तातडीने सोडले जाणार आहे. यासाठी कित्येक महिने अगोदरपासूनच दोन वाघीण वनविभागाने शोधून ठेवल्या होत्या. मात्र त्यापैकी एका वाघिणीने ताडोबात आपला मुक्काम हलवल्याने आता दुसरी अडीच वर्षांची वाघीण वनाधिकाऱ्यांनी शोधली आहे. दोन्ही वाघिणीच्या ओळखीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
( हेही वाचा : Andheri East Bypoll Election Result: पतीचाही रेकॉर्ड मोडत ऋतुजा लटके विजयी, ‘नोटा’चा कोटाही वाढला)
वाघांना मूळ जंगलातून पकडून नव्या जंगलात सोडण्याचा प्रयोग देशपातळीवर दुस-यांदाच होत आहे. सध्या या दोन्ही वाघीण जंगलात मुक्त संचार करत आहेत. वाघिणीना जेरबंद केल्यानंतर तातडीने त्याच दिवशी त्यांना नवेगाव नागझिरा येथील व्याघ्र प्रकल्पात सोडले जाईल. नवेगाव नागझिरा येथील जंगलात सोडण्यापूर्वी वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना रेडिओकॉलर केले जाईल. या वाघिणींनी कोणत्याही माणसावर हल्ला केलेला नाही. संघर्षाची पार्श्वभूमी नसल्याने नव्या जंगलात संघर्षाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
एकाही वाघाचे स्थलांतर न करण्यामागील कारण
एका वाघाच्या जंगलातील प्रदेशात दुसऱ्या वाघाला वाव नसतो. वाघाची वाढती संख्या आणि कमी पडणारे जंगल या समस्येतूनच विदर्भात संघर्षाची ठिणगी वाढत आहे. आपल्या प्रदेशात वाघिणीचा जास्त संख्येने वावर असल्यास वाघ पसंती दर्शवतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन तर तिसऱ्या टप्प्यात तीन वाघीणींचे स्थलांतर केले जाईल.
Join Our WhatsApp Community