ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे दिनांक 19 मे 2022 ते 29 मे 2022 या दरम्यान रात्री ११ ते सकाळी 4 वाजेपर्यंत ठाणे- घोडबंदर रोड या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे फुल्लं! चाकरमान्यांनी धरली परतीची वाट; उन्हाळी विशेष गाड्यांना दिली मुदतवाढ)
मुंबई मेट्रो लाईन-4 चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम सुरू आहे. या कामाच्या दरम्यान मेट्रो -4 च्या पिलर क्र. 61 ते 64 विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, घोडबंदर रोड पिलर क्र 24 ते 26 वेदांत 61 हॉस्पिटल घोडबंदर रोड ठाणे आणि पिलर 44 ते 45 ओवळा सिग्नल या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यावेळी ठाणे- घोडबंदर रोड या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
वाहतुकीत बदल
प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – मुंबई-ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबई-ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – मुंब्रा-कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाच्या सर्व जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा-कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गेइच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक 24 ते 26 व पिलर क्र. 44 ते 45 वर गर्डर टाकण्याच्या वेळी वेदांत हॉस्पिटल कट जवळ डावे वळण घेवून विहंग हिल्स सोसायटी कट जवळ उजवे वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील. तसेच पिलर क्रमांक 61 ते 64 वर गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल्स सोसायटी कट जवळ डावे वळण घेवून सर्व्हिस रोडने नागलाबंदर सिग्नल मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.
कामाच्या वेळा पुढील प्रमाणे-
१) दि. १९/०५/२०२२ रोजा रात्री २३.५५ वा ते दि. २०/०५/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत
२) दि. २१/०५/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा ते दि. २२/०५/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत
३) दि. २३/०५/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा ते दि. २४/०५/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत
४) दि. २५/०५/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा ते दि. २६/०५/ २०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत
५) दि. २७/०५/२००२ रोजी रात्री २३.५५ वा ते दि. 28/०५/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजेपर्यंत
6) दि. २९/०५/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा ते दि. ३०/०५/२०२2 रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत
वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community