PNB Bank Scam: फरार आरोपी मेहूल चोक्सी आणि त्याच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

पीएनबी बॅंक घोटाळा आणि मनी लाॅंड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी आणि इतरांचाही आरोपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मेहुल चोक्सी सध्या पदेशात लपून बसला आहे.

घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी असल्याचे ईडीने म्हटले आहे. प्रीती चोक्सीही वर्ष 2017 पासून अॅंटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसली असल्याचेही ईडीने म्हटले आहे. चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन न्यायालयाने त्याच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता. फरार आरोपी चोक्सी 4 जानेवारी 2018 पासून अँटिग्वामध्ये राहत असून सीबीआय आणि ईडी, त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. फरार व्यावसायिक नीरव मोदी हा मेहुल चोक्सीचा भाचा आहे. पीएनबी बँक घोटाळ्यात नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे.

( हेही वाचा: मुंबई – गोवा महामार्गाचे काम संथगतीने; उच्च न्यायालयाची नाराजी )

ईडीकडून चोक्सीच्या मालमत्तेवर टाच

ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे. मेहुल चोक्सीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. या मालमत्तामंध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधील ऑफीस, कोलकात्यातील शाॅपिंग माॅल, अलिबागमधले फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली. त्याशिवाय,ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here