King Charles III : चार्ल्स यांनी स्वीकारला ब्रिटनच्या महाराज पदाचा पदभार

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स यांची महाराजा म्हणून निवड करण्यात आली. सेंट जेम्स पॅलेस येथे आयोजित सोहळ्यात महाराज चार्ल्स तिसरे यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनचे सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराणी एलिझाबेथ या ब्रिटनच्या सम्राज्ञी म्हणून गेली सात दशके कार्यरत होत्या. चार्ल्स यांना महाराज म्हणून जाहीर केले असले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आजचा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा होता. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन असते. या पदग्रहण सोहळ्यासाठी ब्रिटनचे सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here