कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेल्या चॅट जीपीटी या साॅफ्टवेअरकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात, असे म्हटले जाते. जगातील अनेक कठीण परीक्षांमध्ये हे साॅफ्टवेअर उत्तीर्ण झाले आहे. मात्र, भारतातील सर्वात महत्त्वाची परीक्षा मानल्या जाणा-या यूपीएसीच्या पूर्व परीक्षेमध्ये चॅट जीपीटी फेल झाले.
काय म्हणाले चॅट जीपीटी?
चॅट जीपीटीला विचारण्यात आले की, युपीएससीची पूर्व परीक्षा तुम्ही पास करु शकता का? त्यावर चॅटबाॅटने असे उत्तर दिले की, माझ्याकडे यूपीएससी परीक्षेबाबत खूप माहिती आहे. मात्र, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जुजबी ज्ञान असून उपयोग नाही तर चिकित्सक बुद्धी, वेळेच नियोजन करण्याची क्षमता, ज्ञान मिळवण्याची आसक्ती असे विविध गुण आवश्यक असतात. त्यामुळे UPSC पूर्व परीक्षा मी उत्तीर्ण होणार का? याचे मी निश्चित उत्तर देऊ शकत नाही.
( हेही वाचा: जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या )
चाचणीत चॅट जीपीटी नापास
अॅनालिटिक्स इंडिया नियतकालिकाकडून चॅट जीपीटीची चाचणी घेण्यात आली. चॅट जीपीटीला यूपीएससीच्या पूर्व परीक्षा 2022 च्या प्रश्नपत्रिकेतील 100 प्रश्न विचारण्यात आले. ज्यांची उत्तरे वेबवर उपलब्ध आहेत. मात्र, चॅट जीपीटी केवळ 54 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकले.