Chatrapati Shivaji Maharaj Statue: अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार; पहा व्हिडीओ

3306
Chatrapati Shivaji Maharaj Statue: अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार; पहा व्हिडीओ
Chatrapati Shivaji Maharaj Statue: अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तयार; पहा व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) (Chatrapati Shivaji Maharaj Statue) उभारण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन, सातारा’ आणि इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली होती. याची दखल घेत तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पर्यटन विभागाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता हा पुतळा तयार झाला आहे.

अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी कोथळा बाहेर काढणारा पुतळा
शिवरायांच्या पतुळ्याजवळ लाईट आणि साऊंट शोही सुरु करण्यात येणार आहे. प्रतापगड (Pratapgad) पायथ्याजवळील अफजलखान कबरीजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. (Chatrapati Shivaji Maharaj Statue)

महाराजांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 13 फूट इतकी आहे. तर अफझलखानाच्या पुतळ्यांची उंची 15 फूट इतकी आहे. या पुतळ्याचं अंदाजे वजन 7 ते 8 टन इतकं आहे. हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा कालावधी लागला. शिल्पकार दिपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 कारागिरांच्या अथक मेहनतीतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. (Chatrapati Shivaji Maharaj Statue)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.