छत्रपती शिवरायांनी वापरलेली ‘ती’ वाघनखे लंडनमध्येच! डॉ. विनोद डिसुझा यांच्याकडे आहेत पुरावे…

193

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्यावेळी वापरलेली वाघनखे कुठे गेली, हा प्रश्न आजही चर्चेत येत असतो, याचे उत्तर इतिहासकार आणि शिवप्रेमी शोधत आहेत. पण या प्रश्नाची उकल करणारा दावा शिवप्रेमी डॉ. विनोद रोशन डिसुझा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना केला. ही वाघनखे लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्येच आहेत, तसे लंडन येथील सरकारने लेखी पत्राद्वारे आपल्याला कळवले आहे, असे डॉ. डिसुझा म्हणाले.

gift

वाघनखे नक्की कुठे, यावर मतमतांतरे

अफझलखानला अपराजित सेनापती मानले जात असत, अशा सेनापतीचा शिवरायांनी प्रतापगडाच्या युद्धात वध केला. तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनखांचा वापर केला. या वाघनखांच्या माध्यमातून महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. शिवप्रतापदिनी हे छायाचित्र सर्वत्र दिमाखात लावले जाते. पण हीच वाघनखे आहेत कुठे, हा प्रश्न अधूनमधून चर्चेत येत असतो. याचा कागदोपत्री पुरावा  कुठेच नाही, असे काही इतिहासकार सांगत असतात.

(हेही वाचा आफताबची आणखी एक क्रूर कृती, ४ हिंदू मुलींसोबत होते संबंध?)

वाघनखे लंडनमध्येच असल्याचे ब्रिटिश सरकारची माहिती 

आता याची उकल करणारी माहिती वांद्रे येथे राहणारे शिवप्रेमी डॉ. विनोद रोशन डिसुझा यांच्या माध्यमातून उजेडात आली आहे. लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये शिवरायांनी वापरलेली वाघनखे आहेत, याशिवाय शिवरायांना जगदंबाने दिलेली तलवारदेखील तिथेच आहे. कारण ब्रिटिश सरकारने स्वतः आपल्याकडे पत्रव्यवहार करून तशी माहिती दिली आहे, असा दावा डॉ. विनोद डिसुझा यांनी केला आहे. मागील १३ वर्षांपासून विनोद डिसुझा हे लंडनमधून वाघनखे आणि जगदंबेची तलवार भारतात आणावी, अशी मागणी करत आहेत. त्यासाठी ब्रिटिश सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे, यासंबंधी आपण ब्रिटिश सरकार, इंग्लंडचे राजघराणे आणि राणी एलिझाबेथ – २ यांच्याकडे तब्बल १०१ पत्रे पाठवली आहेत. त्याच्या उत्तरादाखल ब्रिटिश सरकारने आपल्याला कळवले की, जर राज्य सरकार किवा केंद्र सरकार आपल्याकडे पत्रव्यवहार करतील तर आम्ही जगदंबा मातेची तलवार आणि वाघनखे देऊ. त्यानुसार आपण हे सर्व पत्रव्यवहार महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे, असेही डॉ. डिसुझा म्हणाले.

वाघनखे लंडनमध्ये कशी गेली? 

महाराष्ट्रातून वाघनखे लंडनपर्यंत कशी पोहचली, याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख मराठ्यांचा आद्य इतिहासकार आणि साता-याचा रेसिडंट ग्रॅंड डफ याने लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिली आहे. यासंबंधीच्या बक्षीसनाम्याची कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत, ती कागदपत्रे ब्रिटिश सरकारने आपल्याला दिली आहेत, असेही डॉ. डिसुझा म्हणाले. प्रतापसिंह महाराज आणि डफची मैत्री होती. या मैत्रीतूनच हे वाघनख डफला मिळाली, त्याने ते आपल्या मुलाकडे आणि मुलाने त्याच्या मुलाकडे म्हणजे दुस-या ग्रॅंड डफकडे दिले. त्याने ती वाघनख म्युझियमला दिली. त्या म्युझियममध्ये असलेले वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, असा पुरावा स्वतः ब्रिटिश सरकारने दिला आहे, असेही डॉ. डिसुझा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.