देशातील प्रत्येक नागरिकासाठी त्याची ओळख म्हणजे त्याचे आधार कार्ड आहे. देशात आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ते केवळ ओळखीसाठी नाही तर इतर काही उद्देशांसाठी देखील त्याचा वापर आपण करू शकतो. अशाच एका कामाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल हे निश्चित. कारण तुम्ही कधी आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स तपासून पाहिलाय का… नाही ना…कारण आता तुम्ही तुमच्या आधारचा वापर करून तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आधारचा वापर करून अगदी विना इंटरनेट तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकतात.
(हेही वाचा – प्राप्तिकर विभागाचे पश्चिम बंगाल, झारखंडमधील 28 ठिकाणांवर छापे)
आधारच्या कार्डच्या मदतीने बँक बॅलेन्स तपासणे सहज सोपे होणार आहे. पण हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे. यासह तुमचा मोबाईल नंबर देखील तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. विशेष म्हणजे इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही या प्रक्रियेद्वारे बँक खात्यातील बॅलेन्स तपासू शकणार आहात.
कसा तपासता येणार बँक बॅलन्स?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून *99*99*1# डायल करावे लागेल
- यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी रजिस्टर्ड आधार नंबर टाकावा लागेल
- एकदा पुन्हा आधार नंबर टाकून कन्फर्म करावा लागेल
- सर्व माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल
- UIDAI वरूनही तुम्हला एक मेसेज पाठवला जाईल
- बँक खात्यातील बॅलेन्स तपासण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे
मात्र बँक अकाऊंट बॅलन्स चेक करायच्या आधी तुम्हाला काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. सतर्क राहणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community