रस्ता ओलांडताना डंपरच्या धडकेत दोन भावंडांचा मृत्यू

चेंबूर येथील वाशीनाका येथे रस्ता ओलांडत असताना डांबराने भरलेल्या भरधाव डंपरने एका महिलेसह तिघांना धडक दिली. या अपघातात तीन वर्षांचा मुलगा आणि त्याची २५ वर्षांच्या चुलत बहिणीचा मृत्यू झाला असून मुलीची आई गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चेंबूर वाशीनाका येथे घडली आहे.

( हेही वाचा : उध्दव ठाकरे यांच्या शक्तीप्रदर्शनात इच्छुकांची चेहरापट्टी)

डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ऋषी गुप्ता (३) आणि सृष्टी गुप्ता (२५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघा चुलत भावंडांची नावे आहे. ऋषी, सृष्टीगुप्ता आणि तिची आई रंजना हे तिघे मंगळवारी दुपारी चेंबूर वाशीनाका येथे येथील वाहतूक सिग्नल जवळून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या डांबराने भरलेल्या डंपरने या तिघांना धडक दिली. या अपघातात ऋषी आणि सृष्टी या दोघांचा मृत्यू झाला असून रंजना यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी डंपर चालक राजेंद्र पुरोहितला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here