महापालिकेच्या ‘या’ विभाग कार्यालयाने वाचवले ५ हजार विजेचे युनिट; महिन्याला वाचतात सुमारे ४२ हजार रुपये

मुंबई महापालिकेच्या (BMC) पूर्व उपनगरातील एम पश्चिम विभाग कार्यालयात इमारतीत सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला आहे.

275
Chembur BMC Ward saved Five thousand electricity units
महापालिकेच्या या विभाग कार्यलयाने वाचवले ५ हजार विजेचे युनिट; महिन्याला वाचतात सुमारे ४२ हजार रुपये

सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) चेंबूरच्या एम पश्चिम विभाग कार्यालयाने तब्बल ५००० विजेच्या युनिटची बचत केली आहे. महापालिकेने या प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जेची यंत्रणा बसवली असून या प्रणालीच्या यशस्वी वापरामुळे मासिक ५ हजार विद्युत युनिटची निर्मिती होत असून यामुळे विद्युत वापरात तेवढीच बचत होते. या वीज वापराच्या बचतीमुळे महापालिकेचे विद्युत बिलावर होणाऱ्या खर्चातही बचत होत असून महिन्याला ४२ हजार ५०० रुपये वाचले जात आहेत.

(हेही वाचा – राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती )

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) पूर्व उपनगरातील एम पश्चिम विभाग कार्यालयात इमारतीत सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात आला आहे. यासाठी सौर पॅनेलची उभारणी विशेष (अभिनव) प्रकल्प निधी अंतर्गत करण्यात आली आहे. या इमारतीच्या गच्चीवर ९३ सौर पॅनेल बसवण्यात आले असून यातून प्रति किलोवॅट/ प्रतिवर्ष -१२०० युनिट्स ऊर्जा निर्माण होणे अपेक्षित आहे. एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प साकारला जात आहे.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी पूर्व उपनगरच्या अतिरिक्त आयुक्त आणि परिमंडळ पाचचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या विभाग कार्यालयाच्या गच्चीवर १९५ चौरस मीटर परिसरात सौर ऊर्जेचे पॅनेलने बसवण्यात आले. या प्रत्येक सौर ऊर्जा पॅनेलची क्षमता ५४० वॅट एवढी आहे. या सर्वांतून मासिक ५००० युनिट वीज निर्माण होणे अपेक्षित आहे. यामुळे मासिक युनिटमध्ये ५ हजारांची बचत होईल आणि वीज वापराच्या खर्चात मासिक ४२ हजार ५०० रुपये एवढी बचत होईल. या प्रकल्पाची किंमत फक्त ३४ लाख ६० हजार एवढी असून सहा वर्षात या प्रकल्पाचा खर्च वसूल होईल. योग्य देखभाल झाल्यास हे सौर पॅनल २५ वर्ष टिकू शकतात,असे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Municipal Corporation)

हेही पहा

एम पश्चिम विभागाने केलेला प्रयोग महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) सर्व विभाग कार्यालयाच्या इमारतीत केल्यास महापालिकेचे वीज बिलावर होणारे लाखो रुपये वाचले जातील आणि वीज कमी वापरून एक प्रकारे वाढत्या वीज संकटाचा सामना आपण करू शकतो.

भांडुप जलशुध्दीकरण केंद्रात प्रथम प्रयोग

भांडुप जलशुध्दीकरण केंद्राचा एकूण परिसर ३६७ एकर एवढ्या जागेत वसलेला आहे. त्याठिकाणी महासंतुलन जलाशय, क्लोरिन संपर्क टाक्या, पंपिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, गाळणी यंत्रे इत्यादी विभागांच्या छतावर सौरऊर्जा निर्मितीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प बांधणीसाठी आवश्यक ते सविस्तर प्रकल्प अहवाल तयार आय.आय.टी.ने तयार केल्यानंतर या परिसरात रिकाम्या जागांचा वापर करून एकूण ११.३ मेगावॅट एवढ्या क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.या संकुलातील क्लोरिन संपर्क टाक्या व आसपासच्या मोकळ्या जागेवर २.५ मेगावॅट एवढ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्या आला होता. नोव्हेंबर २०१६मध्ये मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प एप्रिल २०१८मध्ये पूर्ण झाला. तेव्हापासून नोव्हेंबर २०२०पर्यंत ६८ लाख १२ हजार १८६ युनिट्स एवढी वीज निर्मिती झालेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात ४ कोटी ७० लाख ३५ हजार ५२ रुपये एवढी बचत झाली असल्याचा दावा जलअभियंता विभागाने केला आहे. त्याचधर्तीवर भांडुप संकुलातील नवीन मुख्य संतुलन जलाशयावर २.५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती, पुरवठा,उभारणी व चाचणी कार्यान्वित करण्यात आला आहे. (Mumbai Municipal Corporation)

एम पश्चिम विभागात बसवलेल्या सौर पॅनेलची वैशिष्ट्य

  • सौर पॅनेलची संख्या: -९३
  • सौर पॅनेलचे आयुष्य :- २५ वर्षे
  • जनरेशन अपेक्षित प्रति किलोवॅट/ प्रतिवर्ष -१२०० युनिट्स
  • सौर पॅनेलने व्यापलेले टेरेसचे क्षेत्रफळ -१९५ चौ.मी.
  • प्रत्येक सौर पॅनेलची क्षमता -५४० वॅट
  • एकूण मासिक निर्मिती अपेक्षित -५००० युनिट्स
  • युनिटमध्ये मासिक बचत -५००० युनिट
  • मासिक बचत रु. ८.५० रुपये प्रति युनिट विचारात घेतल्यास = ४२,५०० रुपये
  • प्रकल्पाची किंमत – ३४,६०,००० रुपये
  • प्रकल्प खर्चाची वसुली – ६ वर्षे
  • सौर पॅनेलचे आयुष्य – २५ वर्षे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.