‘चेंबूर- कर्नाटक काॅलेज ऑफ लाॅ’ विद्यार्थ्यांना पुरवेनात मराठीत प्रश्नपत्रिका

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांना परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना इंग्रजीबरोबरच मराठी भाषेचा पर्याय देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कन्नड भाषकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या चेंबूर कर्नाटक संघ या संस्थेच्या अधिपत्याखाली चेंबूर- कर्नाटक काॅलेज ऑफ लाॅ या महाविद्यालयाने विद्यापीठाच्या या नियमाला नजरअंदाज केले आहे. विधी अभ्यासक्रमाच्या दुस-या सत्राची अंतर्गत परीक्षा इंग्रजीतून देण्यात यावी, असा फतवा महाविद्यालयाने काढला आहे. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.

महाविद्यालयात दुस-या सत्राची अंतर्गत परीक्षा 13 सप्टेंबरपासून सुरु झाली असून, 21 तारखेपर्यंत ती चालणार आहे. अंतर्गत परीक्षा ही फक्त इंग्रजीमध्येच घेण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यासंदर्भात 18 विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत ही परीक्षा मराठीमध्ये घ्यावी, अशी विनंती केली. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून लावत त्यांना इंग्रजीतून परीक्षा देण्यास सांगितले.

( हेही वाचा: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, स्पष्टचं म्हणाले…)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here