‘या’ ब्रॅंण्डचे प्राॅडक्ट वापरल्याने कॅंसर? कंपनीविरोधात खटला दाखल

170

लाॅरिअल (Loreal) कंपनीच्या केमिकल हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे कर्करोग झाल्याचा दावा करत नुकसानभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जेनी मिशेल या महिलेने फेडरल न्यायालयात लाॅरियल कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा केला आहे. या महिलेने Loreal कंपनीवर आरोप केला आहे की,  तीने दोन दशकांहून अधिक काळ Loreal ची उत्पादने वापरली होती, त्यानंतर तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला, ज्यामुळे तिला शस्त्रक्रिया करुन गर्भाशय काढावे लागले.

Loreal कंपनीवर मिसूरीतील एका महिलेने खटला दाखल केला आहे. Loreal cosmetics company च्या केस सरळ करणा-या उत्पादनांचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. जेनी मिशेल या महिलेने शिकागो येथील न्यायालयात धाव घेतली आहे. एका अभ्यासाचा संदर्भ देत महिलेने हा आरोप केला आहे. US National Institute Of Environment health safety च्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की, केस सरळ करणारी उत्पादने वारंवार वापरणा-यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

( हेही वाचा: वसईत फटाक्यांमुळे एकाच दिवसात 6 ठिकाणी आग लागल्याच्या घटना )

काय म्हटलयं अभ्यासात ?

यूएस नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूटच्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या स्त्रियांनी केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्स वापरली त्याच्या तुलनेत ज्या स्त्रिया वर्षातून चार वेळा केमिकल हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट असते. गर्भाशयाचा कर्करोग तुलनेने दुर्मिळ आहे, पण अमेरिकेमध्ये, विशेषत: कृष्णवर्णीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. जेनी मिशेल यांनी याचिकेत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.