Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya मध्ये प्रेक्षकांसाठी ‘मुंबई दालन’

47
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya मध्ये प्रेक्षकांसाठी 'मुंबई दालन'
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya मध्ये प्रेक्षकांसाठी 'मुंबई दालन'

मुंबईतील फोर्ट परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात एक नवे दालन सुरु झाले आहे. मुंबई शहर, शहराचा इतिहास आणि शहराची संस्कृती या विषयाला वाहिलेले हे दालन ‘मुंबई दालन’ म्हणून ओळखले जाणार आहे. दि. १५ ऑक्टोबरपासून हे मुंबई दालन प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya)

( हेही वाचा : Assembly Election 2024 : कुर्ला विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला

दोन भागात विभागलेल्या या मुंबई दालनात एका विभागात मुंबई शहराशी संबंधित काही चित्रे आणि या शहराचा इतिहास सांगणारे शिलालेख ठेवण्यात आलेले आहेत. तर दुसऱ्या विभागात कोळी समाज, मुंबईतील कष्टकरी वर्ग, मुंबईत मोठया प्रमाणात आढळणारा बोंबिल मासा, मुंबई शहरातील अनेक महत्वाच्या वस्तू आणि वास्तू प्रेक्षकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरणार आहे. दरम्यान मुंबईची ओळख असणाऱ्या गिरणगावाशी संबंधित वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील चित्रपटसृष्टी, बेस्ट बस सेवा याच्याशी निगडीत गोष्टीही या प्रदर्शनात दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा इतिहास, संस्कृती जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील हे प्रदर्शन एक पर्वणीच ठरणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya)

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.