Chhattisgarh: नारायणपूरच्या अबुझमद भागात ७ नक्षलवादी ठार, शस्रे आणि स्फोटके जप्त

163
Chhattisgarh: नारायणपूरच्या अबुझमद भागात ७ नक्षलवादी ठार, शस्रे आणि स्फोटके जप्त

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर नारायणपूरच्या अबुझमद भागात मंगळवारी सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये २ महिला नक्षलवादी आहेत. (Chhattisgarh)

अबुझमदच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा सैनिक शोधासाठी निघाले. मंगळवारी सकाळी सैनिक जेव्हा या भागात पोहोचले तेव्हा त्यांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल नक्षलवादी ठार झाले. चकमक झालेल्या ठिकाणावरून एके-४७ यांसह मोठ्या प्रमाणात शस्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. चकमकीनंतर शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा –Devendra Fadnavis: माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास )

ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे माओवाद्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यापूर्वी १६ एप्रिलला कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे साडेपाच तास चकमक झाली होती. डीआरजी आणि बीएसएफच्या जवानांनी माओवाद्यांच्या अड्ड्यात घुसून त्यांच्या २९ नक्षलवाद्यांना ठार केले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.