विवान कारुळकरच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’च्या मराठी आवृत्तीचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले प्रकाशन

मेघदूत या बंगल्यावर झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच त्यांच्या पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर हेदेखील उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजय धाक्रस आणि शिवव्रत महापात्रा यांचीही यावेळी उपस्थिती होती.

254

विवान कारुळकर याने लिहिलेल्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस’ हे पुस्तकही मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले. शुक्रवार, २७ डिसेंबर या दिवशी मेघदूत या बंगल्यावर हा कार्यक्रम संपन्न झाला. विवान कारुळकर याने लिहिलेल्या या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदीतील आवृत्त्या यापूर्वीच प्रकाशित झालेल्या आहेत.

मेघदूत या बंगल्यावर झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर तसेच त्यांच्या पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर हेदेखील उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजय धाक्रस आणि शिवव्रत महापात्रा यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी विवानसोबत संवाद साधत त्याच्याकडून या पुस्तकाबद्दल जाणून घेतले. महाराष्ट्रातील एका मुलाने ही कामगिरी केली, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विवानला शाबासकी दिली, तसेच यापुढेही त्याला अशा कोणत्याही संकल्पनेसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची तयारीही दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी विवानच्या या प्रयत्नांचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या.

या पुस्तकाच्या तीन वेगवेगळ्या भाषांतील आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानावरही त्याचे इंग्रजीतील पुस्तक उपलब्ध असून त्याची प्रतही मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आली. विवानने वयाच्या १६व्या वर्षी ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानांचा खरा स्रोत’ हे पुस्तक लिहिले असून लहान वयात त्याने केलेल्या या संशोधनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विवानच्या पुस्तकाचे देशभरात तसेच विदेशातही खूप कौतुक झाले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवानच्या या पुस्तकाचे कौतुक केले असून त्याला प्रोत्साहन दिले आहे.

(हेही वाचा Delhi Assembly Election : ‘आप’चा सुपडा साफ करण्यासाठी भाजपाची रणनीती; स्वबळावर न लढता NDA दिल्लीच्या मैदानात)

विज्ञान आणि सनातन धर्म यांचा संबंध नाही, असा दुष्प्रचार करणाऱ्यांना विवानने आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. तसेच नवी पिढी विज्ञानाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा याकडेही सकारात्मक पद्धतीने पाहते हेदेखील त्याने आपल्या या लेखनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. हरियाणामधील गुरूग्राम येथील एसजीटी विद्यापीठात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‘द सनातन धर्म : ट्रू सोर्सेस ऑफ ऑल टेक्नॉलॉजीस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये ‘नॅशनल कॉन्फरेन्स फॉर रिसर्च स्कॉलर्स ऑफ भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम, विविभा २०२४’ कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते.

विवानचे दुसरे पुस्तक ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजी’ आणि  ‘सनातन धर्म: सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ या पहिल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनासाठी वेळ दिल्याबद्दल विवानच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच विवानच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्याला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल टेक्नॉलॉजी’ हे पुस्तक अमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.