स्वातंत्र्याच्या अमृतकाळात संरक्षण दलांसोबत निर्मितीत योगदान देणारी परिसंस्था देखील प्रगत होणे आवश्यक आहे. सैन्य अद्ययावत होण्यासाठी संरक्षण दले, संशोधन संस्था, निर्मिती उद्योग एकत्र येऊन योगदान देण्याची गरज आहे. त्यामुळे परकीय चलनही वाचेल, सैन्य सज्जतेत परिपूर्णता येई,’ असे प्रतिपादन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केले.
निबे लिमिटेड या संरक्षण दलांसाठी साहित्य सामग्री उत्पादन करणाऱ्या खासगी क्षेत्रातील कंपनीने आयोजित केलेल्या ‘एमएसएमई डिफ एक्स्पो २०२३’ या संरक्षण साहित्य, सामग्री, तंत्रज्ञान प्रदर्शनाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
निबे लिमिटेडच्या द्वीतिय वर्धापनदिनानिमित चाकण जवळ खालुब्रे एमआयडिसी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. संरक्षण क्षेत्रासाठी विविध सामग्री तयार करणाऱ्या खासगी ३७ कंपन्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनाची पाहणी अनिल चौहान यांनी केली. निबे लिमिटेडच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
अनिल चौहान म्हणाले, ‘निबे लिमिटेडचे काम गुणवत्तापूर्ण आहे. हे उद्योग राष्ट्र निर्मितीत योगदान देत आहेत. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन आणि विकासाची गरज आहे. भारत सातत्याने याया दिशेने प्रगती करीत आहे.’
(हेही वाचा – ‘गोबेल्स नीती’ अवलंबणा-या ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा – अभय वर्तक)
निबे लिमिटेडकडून संरक्षण दलांसाठी ब्रिज इक्वीपमेंट, क्रेन्स, नेव्हल स्ट्रक्चर्स, फ्युएल स्टोरेज टँक, मिसाईल लॉंचर स्ट्रक्चर, ऑक्सिजन जनरेटींग प्लांट, केबल वायर हार्नेस, राऊटर्स, कन्सोल अशी अनेक उपकरणे तयार केली जातात. ही उपकरणे आणि सामग्री प्रदर्शनात मांडली होती. रोबो वेल्डींग, इलेक्ट्रीक वाहने, वेल्डींग गँट्री, कुका रोबो, द्रू लेसर मशीन, मशीनगन अशा सामग्रीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community