परळीत बालविवाह; नातेवाईक, फोटोग्राफर, मंडपवाल्यासह 200 वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहाचे प्रकार समोर येत आहेत. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असणा-या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आला. हा धक्कादायक प्रकार बीडच्या परळी तालुक्यातील नंदागौळ गावात उघडकीस आला आहे. तर याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका 16 वर्षीय मुलीचा गावालगत असणा-या चोपणवाडी येथील तरुणाशी सोमवारी दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून, तिचा सोमवारी गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र, ती पेपरला गैरहजर होती, त्याचवेळेस तिचा बालविवाह झाला.

( हेही वाचा: आठ तासांची झुंज व्यर्थ; कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडून पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू )

200 जणांवर गुन्हा दाखल

परळी येथे झालेल्या बालविवाहप्रकरणी आता मुला- मुलीच्या आई- वडिलांसह मामा- मामी, भटजी, फोटोग्राफर, मंडपवाला, आचार्यावर आणि नंदागौळसह चोपणवाडी लग्नाला असणा-या तब्बल 200 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here