फेरीवाले बनून मुले चोरणारी महिला टोळी मुंबईत सक्रिय

139

मुंबईसह राज्यात लहान मुले चोरी करून त्यांची बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-ठाण्यात मुले चोरी करणाऱ्या काही महिला पोलिसांना अटक केली असली, तरी या प्रकारच्या अनेक महिला टोळ्या शहरामध्ये फिरत आहेत. मुंबईतील घोडपदेव परिसरात काही दिवसांपूर्वी कपड्यावर भांडे विकण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने एका घरातून साडे तीन महिन्यांचे मुल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात मुले चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र मुले अद्याप सापडली नसल्यामुळे मुलांचा शोध घेतला जात आहे.

महिलेने गुंगीच्या औषधांचा रुमाल सपनाच्या नाकाला लावला

मुंबईतील घोडपदेव परिसरातील फेरबंदर येथील संघर्ष सदन पहिला मजला या ठिकाणी राहणाऱ्या सपना बजरंग मकदुम (३६) या आपल्या साडेतीन महिन्यांच्या बाळासह घरात एकट्याच होत्या. या दरम्यान कपडे आणि नादुरुस्त जुने मोबाईल फोनवर भांडे विकणारी महिला फेरीवाली आली होती. सपनाचे साडेतीन महिन्यांचे बाळ खाटेवर होते, तर सपनाने या फेरीवाल्या महिलेकडे लहान बाळाचे कपडे ठेवण्यासाठी बास्केट आहे का, असे विचारले असता या महिलेने तिला बास्केट दाखवले असता सपना या आतल्या खोलीत जुने मोबाईल घेण्यासाठी वळताच या महिलेने गुंगीचे औषधाने भरलेला रुमाल सपनाच्या नाका तोंडावर लावला.

(हेही वाचा मुंबईकरांनो सावधान! आगामी दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता)

सीसीटीव्ही फुटेज फुटेजवरून महिलांचा शोध

सपना बेशुद्ध होताच या फेरीवाल्या महिलेने त्याच बास्केटमध्ये सपनाचे खाटेवर असलेले साडेतीन महिन्यांच्या बाळाला टाकून घेऊन गेली. पती कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताबडतोब परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सपना मकदुम राहत असलेल्या इमारतीतून तीन महिला बाहेर पडताना दिसून आल्या. तसेच रस्त्यावरील फुटेजमध्ये एका महिलेचा कुशीत सपनाचे बाळ दिसून आले आहे. या फुटेजवरून पोलिस या महिलांचा शोध घेत आहे.

संशयावरून तीन महिला चौकशीसाठी ताब्यात

याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता आदल्या दिवशी एक महिला सपना यांच्या घरी मोबाईलवर भांडे विकण्यासाठी आली होती, त्यावेळी सपनाने मोबाईलच्या बदल्यात बास्केट मगितले होते, मात्र या मोबाईलवर बास्केट मिळणार नाही त्यासाठी टच स्क्रीनवाला मोबाईल द्यावा लावेल, असे सांगून सपनाच्या घराची रेकी करून गेली होती व दुसऱ्या दिवशी दुसरी महिला आली व तिने बाळ चोरी केले असल्याचे प्राथमिक तापसावरून समोर आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी संशयावरून तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नसून चोरीला गेलेले बाळ देखील मिळालेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.