जगात पहिल्यांदाच Robot बनला कंपनीचा CEO

एखाद्या साय-फाय चित्रपटाप्रमाणेच एका चिनी मेटाव्हर्स कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मल्टिप्लेअर ऑनलाइन गेम विकसित आणि ऑपरेट करणा-या, तसेच मोबाइल अॅप्लिकेशन बनवणा-या नेटड्रॅगन वेबसाॅफ्ट कंपनीने अलीकडेच आपली मुख्य उपकंपनी फुजियान नेटड्रॅगन वेबसाॅफ्टचे नवीन सीईओ म्हणून कुत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आभासी मानवीय रोबोट मिस तांग यू कार्यकारी पद धारण करणारा जगातील पहिला रोबोट ठरला.

मिस तांग यू काय काम करणार?

तांग यू कंपनीच्या संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभागामध्ये आघाडीवर असेल. सुमारे 10 अब्ज डाॅलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. कंपनीने म्हटले की, तांग यू प्रक्रियेचा प्रवाह सुव्यवस्थित करेल, कामाची गुणवत्ता वाढवेल. तांग यू एक रिअर- टाइम डेटा हब म्हणून दैनंदिन कामकाजात तर्कसंगत निर्णयांना समर्थन देण्यासाठी विश्लेषणात्मक साधन म्हणून काम करेल.

( हेही वाचा:  पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू- किशोरी पेडणेकर )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here