China bank crisis: बँकांबाहेर रणगाडे; चीनची अजब सुरक्षा

चीनमध्ये सध्या मोठे बॅंकिंग संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे अनेक चिनी बॅंकांनी ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लावले आहेत. त्यामुळे हजारो नागरिक रस्त्यांवर निदर्शने करण्यासाठी उतरले आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे आता बॅंकाच्या आजूबाजूला रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.

( हेही वाचा: आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही करणार महाराष्ट्र दौरा; नियोजन सुरु )

बॅंकेतून पैसै काढण्यावर निर्बंध 

एप्रिल 2022 मध्ये चिनी बॅंकामध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधित माहिती देण्यात आली होती. त्यात 40 अब्ज युआन म्हणजेच 6 अब्ज डाॅलर्स चीनच्या बॅंकींग व्यवस्थेतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर हेनान आणि अनहुई प्रांतातील बॅंकांनी ग्राहकांना बॅंकेतून पैसे काढण्यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. त्यासाठी सिस्टिम अपग्रेडचे कारण देण्यात आले होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here