China Earthquake : १११ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु

चीनच्या गांसू प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक इमारती कोसळल्या. या दुर्घटनेत किमान १११ लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. तसेच घटनास्थळी ३३ रुग्णवाहिका आणि इतर व्यावसायिक वाहने आहेत.

242
China Earthquake : १११ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु

काल म्हणजेच सोमवार १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चीनमध्ये मोठा भूकंप (China Earthquake) झाला. यामध्ये किमान १११ लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरने म्हटले आहे.

६.२ रिश्टर स्केलचा भूकंप

सरकारी ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे (China Earthquake) वायव्य चीनमधील गांसू प्रांतात आतापर्यंत १०० आणि किंगहाई प्रांतात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ब्लू स्काय बचाव पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. गांसू प्रांतातील जिशिशान काउंटीमध्ये ६.२ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर गांसू आरोग्य विभागाने ३३ रुग्णवाहिका आणि इतर व्यावसायिक वाहने तसेच १७३ वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पाठवले.

(हेही वाचा – NIA ने उधळला ‘IED’ स्फोटाचा कट; ISIS चे बल्लारी मॉड्युल उध्वस्त)

हैदोंगमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान

किंगहाई प्रांताने ६८ रुग्णवाहिका आणि ४० हून अधिक प्रांतीय आणि नगरपालिका तज्ञांना प्रभावित भागात बचावकार्य (China Earthquake) करण्यासाठी पाठवले. आज (मंगळवार) सकाळी ६:३० वाजेपर्यंत ३०० हून अधिक जखमींवर उपचार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही तातडीने वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद दल पाठवले. भूकंपामुळे किंगहाई प्रांतातील हैदोंगमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान चीनमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये (China Earthquake) बचावकार्य सुरु आहे. हैदोंग हे जिशिशान काउंटीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.

(हेही वाचा – Ind vs SA 2nd ODI : रिंकू सिंग किंवा रजत पाटिदार यांच्यापैकी एकाला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी )

२०१० च्या भूकंपाची आठवण

ग्लोबल टाईम्सच्या मते, या भूकंपाने (China Earthquake) २०१० ची आठवण करून दिली आहे. २०१० मध्ये झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे गांसू प्रांतात १०० लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.