‘तुम्ही गरोदर कधी होणार?’, सरकारचा नवविवाहीत महिलांना थेट फोन!

134

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन सध्या आपली लोकसंख्या घटत असल्याने चिंतेत आहे. एकेकाळी चीन आपली लोकसंख्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आता लोकसंख्येवर नियंत्रण ठेवल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. चीनमध्ये अधिकारी आता नवविवाहित महिलांना त्यांच्या गरोदरपणाशी संबंधित प्रश्न विचारत आहेत. चीनमधील एका नवविवाहित जोडप्याने एका सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये म्हटले की, त्यांचे स्थानिक सरकार त्यांना विचारत आहे की, तुम्ही गरोदर कधी होणार? ही पोस्ट येताच हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यांनाही असे थेट फोन अधिकाऱ्यांकडून आल्याचे अनेकांनी सांगितले. नंतर ही पोस्ट चीनने सेन्सॉरशिपद्वारे काढून टाकली.

(हेही वाचा – एलॉन मस्कनी ताबा घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सुरू होणार? ट्विटरने केला खुलासा)

गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट पार्टीचे 20 वे नेते म्हणून पुन्हा निवड झाली आहे. यावेळी जिनपिंग यांनी जन्मदर वाढवण्यासाठी आणि देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी धोरण स्थापन करणार असल्याची घोषणा केली. ‘Lost Shuyushou’ नावाच्या युजरने चीनच्या सोशल मीडिया Weibo वर आपल्या सहकाऱ्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यात लिहिले की, ‘नानजिंग शहर सरकारच्या महिला आरोग्य सेवा विभागाकडून त्यांना याबाबत फोन करण्यात आले होते.

काय होतेय विचारणा

एका चीनी महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ही बाब चर्चेत आली आहे. या महिलेने तिच्या सहकारी महिलेला आलेल्या कॉलबद्दल सांगितले. या महिलेचा विवाह गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाला होता. त्यानंतर तिला आतापर्यंत दोनदा फोन आला. या फोनवर तिला नवविवाहीत असूनही अद्याप मुलाला जन्म का दिला नाही, अशी विचारणा करतानाच त्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला फोनवरील अधिकाऱ्यांनी दिला.

चीनमध्ये 1980 ते 2015 पर्यंत एक मूल धोरण लागू होते. मात्र चीनची लोकसंख्या कमी होत असल्याचे चीनने नंतर मान्य केले. लोकसंख्या अशीच कमी होत राहिल्यास वृद्धांच्या सांभाळ कोण करणार, याचे संकट निर्माण होईल. दरम्यान, चीनमध्ये जन्मदर सातत्याने घसरत आहे. गेल्या वर्षी जन्मदर 1.06 कोटी होता, तो यंदा केवळ एक कोटीच राहण्याची अपेक्षा आहे. 2020 मध्ये जन्मदरात 11.5 टक्के घट झाली होती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.