China Praise Narendra Modi : चिनी ड्रॅगन नरमला; केली पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा

ग्लोबल टाईम्सच्या लेखात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. यामधून अमेरिका, जपान आणि रशियासारख्या जागतिक शक्तींशी संबंध मजबूत करण्याची कबुली दिली आहे. तसेच त्यात नमूद केले आहे की भारत हा विचार करण्यासारखा एक नवीन भू-राजकीय घटक बनला आहे.

243
China Praise Narendra Modi : चिनी ड्रॅगन नरमला; केली पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा

सतत भारतावर टीका करणाऱ्या चीनकडून आता जाहीरपणे भारताच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले आहे. चीनच्या प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान मोदींच्या (China Praise Narendra Modi) नेतृत्वाखालील भारताच्या परराष्ट्र धोरण धोरणाचे कौतुक केले आहे. अमेरिका, जपान आणि रशियासारख्या महत्त्वपूर्ण जागतिक शक्तींशी आपले संबंध मजबूत केल्याबद्दल आणि रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान सूक्ष्म भूमिका दाखवल्याबद्दल भारताचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal : एकीकडे ईडीच्या रडारवर तर दुरीकडे गुजरातचा दौरा ; नेमकं चाललंय काय?)

लेखातून भारताच्या उल्लेखनीय प्रगतीवर भर –

सविस्तर माहितीनुसार, शांघायमधील फुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक म्हणून काम करणाऱ्या झांग जियाडोंग यांच्या एका लेखात, मागील चार वर्षांत भारताच्या उल्लेखनीय प्रगतीवर भर देण्यात आला. या लेखात भारताचा (China Praise Narendra Modi) भक्कम आर्थिक विस्तार, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल, विशेषतः चीनबद्दलच्या दृष्टिकोनातील लक्षणीय बदल देखील मान्य करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Suryakumar Yadav : २०२३ मध्येही आयसीसी टी-२० पुरस्कारासाठी सुर्यकुमारचंच पारडं जड)

भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर –

“उदाहरणार्थ, चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असमतोलावर (China Praise Narendra Modi) चर्चा करताना, भारतीय प्रतिनिधी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचे. पण आता ते भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत “, जिआडोंग यांनी लिहिले. तसेच भारत देशाच्या धोरणात्मक आत्मविश्वासाला अधोरेखित केल्याबद्दलही या लेखातून प्रशंसा करण्यात आली आहे.

झांग म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (China Praise Narendra Modi) यांनी सत्ता हाती घेतल्यापासून, त्यांनी अमेरिका, जपान, रशिया आणि इतर देश आणि प्रादेशिक संघटनांशी भारताच्या संबंधांना चालना देण्यासाठी उत्तम धोरणाचा अवलंब केला आहे.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा; विकास कामाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना)

भारत एक नवीन भू-राजकीय घटक –

पुढे आपल्या लेखाचा समारोप करताना झांग म्हणाले की; “असे दिसते आहे की बदललेला, मजबूत आणि अधिक ठाम भारत हा एक नवीन भू-राजकीय घटक बनला आहे ज्याचा अनेक देशांनी विचार करणे आवश्यक आहे”. (China Praise Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.