कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग यांची पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.
(हेही वाचा – BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, अखेर इतका बोनस झाला जाहीर)
जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. वास्तविक, चीनमध्ये 1980 नंतर सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला. जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्यही आहेत. या 25 सदस्यीय ‘पॉलिट ब्युरो’ने निवडणुकीच्या आधारे चीनवर राज्य करण्यासाठी स्थायी समितीचे सात किंवा अधिक सदस्य निवडले. या समितीतून जिनपिंग यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही निवड झाली. त्यांच्याकडे पुढील पाच वर्षांसाठी पक्ष आणि देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिनपिंग या वर्षी सीपीसी प्रमुख आणि अध्यक्ष म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. पक्षाचे संस्थापक माओ झेडोंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर असणारे ते पहिले चिनी नेते ठरले आहेत. माओ त्से तुंग यांनी सुमारे तीन दशके चीनवर राज्य केले. नवीन पद मिळणे म्हणजे जिनपिंग यांचाही माओप्रमाणे आयुष्यभर सत्तेत राहण्याचा मानस आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community