China’s New Map : चीनच्या कुरापती : ‘अरुणाचल प्रदेश आमचाच’; चीनकडून पुन्हा नवीन नकाशा जाहीर

179
China's New Map : चीनच्या कुरापती : 'अरुणाचल प्रदेश आमचाच'; चीनकडून पुन्हा नवीन नकाशा जाहीर

चीनने पुन्हा एकदा भारताला (China’s New Map) डिवचलं आहे. चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र त्यांच्या हद्दीत असल्याचा चीनने दावा केला आहे. अशा आशयाचा त्यांनी एक नवीन नकाशा प्रकाशित केला आहे. काल म्हणजेच सोमवार २८ ऑगस्ट रोजी चीनने आपला नवीन अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे.

चीनचे (China’s New Map) अधिकृत माध्यम ग्लोबल टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Bombay High Court : चक्क इमारतीनेच उच्च न्यायालयात दाखल केली याचिका; जाणून घ्या नेमका प्रकार काय?)

अलीकडेच ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग (China’s New Map) यांची भेट झाल्यानंतर चीनने हा नकाशा प्रसिद्ध केला आहे. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे संकलित केला आहे. असे ग्लोबल टाईम्सने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

एप्रिल 2023 मध्ये चीनने (China’s New Map) आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली होती. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी 2021 मध्ये चीनने 15 आणि 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावे बदलली होती.

चीनच्या (China’s New Map) या कृत्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते – चीनच्या अशा कारवाया याआधीही आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही ही नवीन नावे नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अशा प्रकारे नाव बदलून वास्तव बदलणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.