अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडल्यानंतर फुग्याच्या अवशेषांमधून चीनचा मोठा कट उघड झाला आहे. चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यात सक्षम असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने अमेरिकेप्रमाणे 40 देशांमध्ये असे स्पाय बलून सोडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेने फोडला चीनचा स्पाय बलून
अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे, चीनच्या स्पाय बलूनमध्ये कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान होते. अमेरिकेने आकाशात उडणारा चिनी स्पाय बलून 5 फेब्रुवारी रोजी फोडला होता. अमेरिकेने लढाऊ विमानाच्या मदतीने क्षेपणास्त्र मारा करत हा स्पाय बलून फोडला होता. त्यानंतर बुधवारी अमेरिकेने नौदलाला या स्पाय बलूनचे अवशेष अटलांटिक महासागारता सापडले. या अवशेषांवरुन अमेरिका या स्पाय बलूनसंदर्भात पुढील तपास करत आहे.
( हेही वाचा: खरचं भूकंपरोधक इमारती भूकंपप्रुफ असतात? जाणून घ्या सविस्तर )
40 पेक्षा जास्त देशांमध्ये चीनचा स्पाय बलून
यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे की पीआरसीने हे पाळत ठेवणारे फुगे म्हणजेच स्पाय बलून पाच खंडातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये पाठवले आहेत. बायडेन प्रशासन त्या 40 देशांशी थेट संपर्क साधून त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.
Join Our WhatsApp Community