पाकिस्तानच्या ताब्यात असलेला गिलगीट बाल्टिस्तान हा जम्मू- काश्मिरमधील भूभाग भारताचा असला तरी तो परस्पर चीनला भाडेतत्वावर देण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचा दावा एका संस्थेने आपल्या अहवालात केला आहे.
पाकिस्तानवर सध्या कर्जाचा प्रचंड डोंगर असून, ते कर्ज फेडण्यासाठीच हा व्यवहार करण्याचा विचार ते करत असल्याचा अंदाज आहे. काराकोरम नॅशनल मूव्हमेंट या संस्थेच्या अध्यक्षा मुमताज नागरी यांनी अहवालात गिलगीट बाल्टिस्तानबाबत हा विचार व्यक्त केला आहे. गिलगीट बाल्टिस्तान हा आतापर्यंत दु्र्लक्षित राहिलेला भाग भविष्यातील युद्धभूमी बनू शकते, असे नागरी यांना म्हटल्याचे पाकिस्तानमधील ‘अल अरेबिया’ पोस्ट ने म्हटले आहे.
( हेही वाचा: ‘शिवसेने’चा आकडा कमी झालाय, संजय राऊतांनीच केलं मान्य म्हणाले… )
या भागावर पाकिस्तानचा बेकायदा ताबा
गिलगीट बाल्टिस्तानचा उत्तर भाग चीनच्या सीमेला लागून आहे. काश्मिरमधील गिलगीट बाल्टिस्तान या भागावर पाकिस्तानचा बेकायदा ताबा आहे. त्यामुळे जो भाग मुळातच पाकिस्तानचा नाही तो भाग चीनला भाडेतत्वावर देण्याचा त्यांचा विचार आहे, असे अहवालात म्हटले आहे.