चीनचा कुटील डाव; LAC जवळ चीन उभारतोय महामार्ग

चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहेत. चीन नियंत्रण रेषेजवळील भागात गावं वसवत आहे. आता चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ महामार्ग बांधणार आहे. चीन बांधत असलेला महामार्ग हा भारताच्या सीमारेषा भाग मार्गे जिंगजॅंग आणि तिबेटला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे चीनची सामरिक स्थिती आणखी मजबूत होणार आहे. लष्कराच्या हालचालीसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.

2035 पर्यंत उभारणार महामार्ग 

साऊथ चायना माॅर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटच्या ल्हूंज काउंटीमधून शिंजियांग क्षेत्रातील काश्गर येथे जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा चीन सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 345 नवीन प्रकल्पांपैकी एक आहे. या योजनेनुसार, 2035 पर्यंत एकूण 4 लाख 61 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करुन चीन आपल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकायचे प्रयत्न करत आहे.

( हेही वाचा: प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी )

‘या’ भागातून जाणार महामार्ग 

ल्हूंज काऊंटी हा भाग अरुणाचल प्रदेशजवळ आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा करण्यात येतो. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. जी 695 या नावाे ओळखला जाणार महामार्ग हा कोना काउंटी भागातून जाण्याची शक्यता आहे. काम्बा काउंटी भागाची सीमा सिक्कीमला जोडली गेली आहे. गयीरोंग काउंटी नेपाळच्या सीमालगत भागात आहे. चीनकडून बांधण्यात येणा-या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग हा भारताच्या भूभागातून जाणार आहे. यामध्ये डेपसांग मैदानी प्रदेश, गलवान खोरे आणि हाॅट स्प्रिंगसारख्या भागातून जाणार असल्याचे, म्हटले जात आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here