चीनच्या वेबसाईट केल्या हॅक, ‘बोलो पावभाजी’ चर्चेत

168

मागील दोन दिवसांपासून चीन आणि भारत यांच्यातील सीमावाद पुन्हा उसळून आला आहे. डोकलामप्रमाणेच अरुणाचल प्रदेशाकडील भारताच्या सीमेवर चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली. त्यावेळी भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात झटापट झाली, त्यात चिनी सैनिक जास्त प्रमाणात जखमी झाले. या प्रकरणाची चर्चा थांबत नाही तोच सोशल मीडियात चीनच्या वेबसाईट हॅक केल्याचे वृत्त सोशल मीडियात प्रसारित होत आहे. ‘बोलो पाव भाजी’ या नावाने अनभिज्ञ हॅकर्सने ही कमाल केल्याचे म्हटले आहे.

‘बोलो पावभाजी’ या अज्ञात हॅकरने चिनी सर्व्हर हॅक केला आहे. या हॅकर्सने चिनी वेबसाइट खराब केली आणि चिनी सर्व्हरचा रूटमध्ये प्रवेश केल्याचे फोटो अपलोड केले. या सर्व्हरवरील सर्व वेबसाइटचा डेटा डंप करण्यात आल्याचे हॅकरने नमूद केले.

तर एका नेटकऱ्याने चक्क पावभाजीचे रॅप सॉंग ट्विटरवर अपलोड केले आहे.

काही जण म्हणतात, हा एम्सची वेबसाईट हॅक केल्याचा बदला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.