चिनी सैन्याकडून 17 वर्षीय भारतीय मुलाचं अपहरण, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

157

भारत-चीन सीमेवर वाढत्या तणावादरम्यान घृणास्पद कृत्य समोर आले आहे. अरूणाचल प्रदेशातील भारताच्या जमिनीवर चीन आपला दावा करत असताना चीन त्याच्या कारवाया सुरूच ठेवताना दिसत आहे. अरुणाचल प्रदेशात घुसून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने एका भारतीय तरुणाचं अपहरण केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, भाजप खासदाराने केंद्र सरकारकडे मदतीचं आवाहन देखील केले आहे.

भाजप खासदाराचं केंद्राकडे मदतीचं आवाहन

अरुणाचल प्रदेशातील भाजप खासदार तापीर गाओ यांनी दावा केला आहे की, एका भारतीय अल्पवयीन मुलाचे चिनी सैन्याच्या सैनिकांनी अपहरण केले आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती खासदारांनी केली आहे. अप्पर सियांगच्या उपायुक्तांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना किशोरवयीन मुलाच्या सुटकेसाठी कळवण्यात आले असून त्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे अपहरण सियांग जिल्ह्यातील लुंगटा जोर भागातून झालं आहे. जिथे चीनने 2018 मध्ये भारतात 3-4 किमीचा रस्ता तयार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने बिशिंग गावातून 17 वर्षीय मीरम तारणचं अपहरण केलं आहे, अशी माहिती तापीर गाओ यांनी दिली.

(हेही वाचा – थंडीसोबत वाढतंय प्रदूषण, महाराष्ट्राची हवा खराब!)

भाजप खासदार तापीर गाओ तसेच काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी भारत सरकारकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. अरुणाचलचे खासदार तापीर गाओ यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रींना चिनी सैन्याने एका मुलाचे अपहरण केल्याची माहिती दिली आणि सरकारी यंत्रणांनी या मुलाची लवकर सुटका करण्याची विनंती केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.