मुंबईकरांचे चिपको आंदोलन

154

मुंबईचे फुफ्फुस समजल्या जाणा-या आरे जंगलाला वाचवण्यासाठी रविवारी आरेत वृक्षप्रेमींनी चिपको आंदोलन केले. आरेतील वृक्षतोड आणि फांद्याच्या छाटणीला विरोध करण्यासाठी विविध संस्थांनी सकाळी चिपको आंदोलन आयोजित केले होते.

Save aaray 7

(हेही वाचा -बेस्टच्या आगारात अधिकार्‍यांची मनमानी; ऐकूनच घेई ना कोणी!)

आरेतील रस्त्यावरील सिमेंटीकरणाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. मुंबईतील पूरजन्य परिस्थितीला वाचवण्यासाठी आरे महत्त्वाची भूमिका बजावते. पर्यावरणदृष्ट्या संवेदशनशील आरेत कोणताही विकास नको. सिमेंटीकरणामुळे मातीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमकुवत होईल, असा मुद्दा पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते तबरेज अली सय्यद यांनी मांडला.

Save aaray 6

आरेत मेट्रोचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणा-या ११२ झाडांच्या फांद्या कापल्या जात आहेत. ११२ झाडांची मूळे रस्त्याला लागून आहेत. सिमेंटच्या आच्छादनामुळे झाडांना पाणी शोषण्याची मर्यादा आहे. फांद्याही छाटल्या तर झाडे जगणारच नाहीत, हा मुद्दा तबरेज यांनी मांडला.

Save aaray 5

चिपको आंदोलनात सहभागी संस्था 

  • युथ फॉर आरे.
  • डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि आरे वाचवा.

Save aaray 1

आंदोलनकर्त्यांचे मुद्दे

० मेट्रो बोगीच्या कन्टेनर ठेवण्यासाठी जागा तयार करण्यासाठी ११२ झाडांच्या फांद्यांची छाटणी नको.
० आरेतील २० झाडांची कत्तल रोखा.
० आरेतील मेट्रो-३ कारशेडच्या आतील जागेत संशयास्पदरित्या आग लागत आहे. आगीचे सत्र थांबवा.
० आरेत कोणतेही विकासकाम नको, वृद्धाश्रमही नको, आरेची जैवविविधता जपा.

Save aaray 3

पर्यावरणमंत्र्यांची भेट हवी

आरेत कोणतीही विकासकामे नकोत, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आम्ही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही बैठक सार्वजनिक व्यासपीठावर सर्वांसमक्ष व्हावी. बैठकीत पारदर्शकता रहावी, यासाठी आरेसाठी लढणा-या कार्यकर्त्यांसोबत पर्यावरणमंत्र्यांनी बैठक घ्यावी, असे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता तबरेज अली सय्यद यांनी सांगितले.

Save aaray

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.