चित्रदुर्ग हा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात स्थित एक किल्ला आहे. यास चित्रकालदुर्ग असेही म्हणतात, ही छत्रीच्या आकाराची एक उंच टेकडी आहे. मोठमोठ्या दगडांनी बांधलेला हा किल्ला दऱ्या, नदी आणि चिन्मुलाद्रीच्या रांगांमुळे अतिशय आकर्षक वाटतो. चित्रदुर्ग किल्ला कर्नाटक राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. (Chitradurga)
चित्रदुर्ग (Chitradurga) किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना आपण १५०० ते १८०० मध्ये जातो. हा भव्य किल्ला अनेक राजघराण्यांनी बांधला होता. मदकर नायकाच्या काळात हैदर अलीने चित्रदुर्ग किल्ल्यावर तीनदा हल्ला केला, त्यापैकी १७७९ मध्ये शेवटच्या हल्ल्यात हैदर अलीने किल्ला बळकावला आणि त्यानंतर त्याने चित्रदुर्गावर २०० वर्षे राज्य केले. यानंतर ब्रिटिश सैन्याने इस्लामी जिहादी टिपू सुलतानच्या मुलाशी युद्ध करून चित्रदुर्ग किल्ला जिंकला. (Chitradurga)
(हेही वाचा – Sam Pitroda: भारताच्या पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, सॅम पित्रोदा यांनी पुन्हा केले वादग्रस्त विधान)
चित्रदुर्ग किल्ल्याचे प्रवेश शुल्क आहे इतके
चित्रदुर्ग (Chitradurga) किल्ल्याची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. वरच्या किल्ल्यात १८ मंदिरे आहेत, त्यापैकी गोपाळ कृष्ण, नंदी, सुबाराय, एकनाथम्मा, भगवान हनुमान, फलनेश्वर आणि सिद्धेश्वर विराजमान आहेत. खालच्या किल्ल्यात देवीला समर्पित एक विशेष मंदिर आहे. फेब्रुवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तुम्ही खासकरुन या किल्ल्याला भेट देऊ शकता. चित्रदुर्गाचे सर्वात जुने मंदिर हिडिंबेश्वर मंदिर आहे. अनेक इस्लामी राजांनी त्यांच्या राजवटीत चित्रदुर्ग किल्ल्यात मशिदीही बांधून अतिक्रमण देखील केले आहे. (Chitradurga)
चित्रदुर्ग शहर पुणे-बंगळुरु महामार्गावर वसलेले आहे. चित्रदुर्ग शहरात पोहोचल्यानंतर टॅक्सी किंवा बसने किल्ल्यावर जाता येते. हे शहर बंगळुरूशी रेल्वेने चांगले जोडलेले आहे. खरेतर चित्रदुर्गाचे स्वतःचे छोटेसे रेल्वे स्टेशन देखील आहे. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ चित्रदुर्गापासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. चित्रदुर्ग किल्ला सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत उघडा असतो. चित्रदुर्ग किल्ल्याचे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी प्रति व्यक्ती ५ रुपये आणि परदेशी नागरिकांसाठी १०० रुपये प्रति व्यक्ती आहे. (Chitradurga)
Join Our WhatsApp Community