प्रजासत्ताक दिनी संचलनासाठी चित्ररथाची निवड कशी होते? महाराष्ट्र कधीपासून सहभागी झाला? जाणून घ्या सविस्तर

130

प्रजासत्ताक दिनी होणारे पथसंचलन देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रलयासमोर आपले चित्ररथ प्रस्तुत करतात. त्यानंतर पथसंचलनासाठी निवड होते. प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करण्याची जबाबदारी भारताच्या संरक्षण मंत्रालयाची असते. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वातंत्र्यदिनी पथसंचलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. जिथे ते निवडलेल्या विषयावर आपले विचार मांडतात.

चित्ररथाच्या निवडीची प्रक्रिया कशी आहे?

  • भारतामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलनासाठी चित्ररथांची निवड संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीद्वारे केले जाते. ज्यामध्ये कला, चित्रकला, संस्कृत, संगीत, नृत्यकला इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांचा समावेश असतो.
  • मंत्रालयाची समिती प्रथम राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे सादर केलेले प्रस्ताव रंगीबेरंगी, साधे आणि स्वयंस्पष्ट आहेत का याची तपासणी करते.
  • प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील चित्ररथांमध्ये कोणत्याही प्रकारचे नृत्य, एक लोकनृत्य असले पाहिजे जे पारंपारिक वेशभुषा आणि संगीत वाद्य यंत्रासोबत करता येऊ शकते. प्रस्तावामध्ये एक व्हिडिओ क्लिपदेखील समाविष्ट असली पाहिजे.
  • तज्ज्ञ समिती पुढील निर्णय घेताना घटकांचे संयोजन, त्यात समाविष्ट असलेल्या तपशीलांची डिग्री, जनतेवर होणारा परिणाम, संगीत, व्हिज्युअल अपील विचारात घेते.
  • शाॅर्टलिस्ट केलेल्या प्रस्तावांना पुढील टप्प्यांबद्दल माहिती दिली जाते. तसेच, ज्यांना अंतिम मंजूर आवृत्तीच्या अटींवर शाॅर्टलिस्ट करण्यात आलेले असते, तेच प्रजासत्ताक दिनी महामार्गावर पथ संचलनासाठी जातात.

साडेतीन शक्तीपिठांच्या देखाव्याचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथात यावेळी महाराष्ट्राची एकूण सांस्कृतिक वैभव असलेली साडेतीन शक्तीपिठे आहेत. या शक्तीपिठांत महिला शक्तीचासुद्धा सहभाग आहे. या साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्र सादर करणार आहे.

( हेही वाचा: जाणून घ्या भारतीयांच्या जीभेला आवडते काय? )

महाराष्ट्राचा चित्ररथात सहभाग कधीपासून?

प्रजासत्ताक दिनी होणा-या संचालनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणा-या संचलनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच, 1983 मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राच्या चित्ररथानेही क्रमांत पटकावला होता. त्यानंतर 1993, 1994, 1995 अशा सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथानेदेखील पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच, त्यानंतर 2018 मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.