एकाच वेळी फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये चमत्कार करणारे Chuni Goswami

242
भारतीय फुटबॉल म्हटले की काही खेळाडूंची चर्चा केलीच जाते. त्यापैकी एक म्हणजे चुनी गोस्वामी…१९६२ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत त्यांनी प्रथमच आशियाई स्तरावर सुवर्णपदक जिंकले. चुनी (Chuni Goswami) हे स्ट्रायकर पोझिशनमध्ये खेळायचे. त्यांचे पूर्ण नाव ‘सुबिमल गोस्वामी’ असून फुटबॉलप्रेमी त्यांना ‘चुनी गोस्वामी’ या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९३८ मध्ये बंगालमधील दक्षिण कलकत्ता येथील किशोरगंजमध्ये झाला.
वयाच्या १७ व्या वर्षी ते १९५५ मध्ये बंगाल संघाकडून खेळले आणि बंगाल संघाने म्हैसूर संघाचा पराभव करून चॅम्पियनशिप जिंकली. १९५६ मध्ये तो भारतीय ऑलिम्पिक संघाचे सदस्य देखील होते आणि संघाने चीनी संघाचा पराभव केला होता. १९५७ मध्ये चुनी गोस्वामींनी (Chuni Goswami) अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. ते बंगाल संघाचे कर्णधार होते आणि त्यांनी बॉम्बे विद्यापीठ संघाचा करून सामना जिंकला होता.
१९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी संघाचा कर्णधार चुनी गोस्वामी (Chuni Goswami) होते आणि भारताने फायनलमध्ये कोरियाचा २-१ असा पराभव केला. भारताकडून हे गोल जर्नेल सिंग आणि पी.के. बॅनर्जी यांनी केले.
त्याचबरोबर ते फर्स्ट क्लाक क्रिकेटही खेळायचे. सय्यद अब्दुल रहीम हे त्यांचे प्रशिक्षक होते. गोस्वामी (Chuni Goswami) बंगालकडून रणजी करंडक खेळत होते. १९७१-७२ मध्ये त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत संघाचे नेतृत्व केले. १९६३ मध्ये त्यांना ‘अर्जुन पुरस्कार’ आणि १९८३ मध्ये ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आले.  ३० एप्रिल २०२० मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.