कोणाला लागणार CIDCO ची लॉटरी? ४ हजार घरांसाठी तब्बल १५,८०० अर्ज, मंगळवारी सोडत

मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सामान्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोची लॉटरी नेहमी निघत असते. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ४ हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. या ४ हजार घरांसाठी तब्बल १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी या योजनेंतर्गत अर्ज केलेत. ग्राहकांनी केलेल्या या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून घराचे ४ हजार १५८ लाभार्थी ठरणार आहे.

(हेही वाचा – Twitter वर डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा वापसी! एलॉन मस्कच्या सर्वेक्षणानंतर निर्णय)

सिडकोच्या नव्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीच प्रतीक्षा असते. त्यानुसार, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पातील शिल्लक असलेल्या ४ हजार १५८ घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. यावेळी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. यादरम्यान १६ हजार अर्ज आले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून वेळापत्रकानुसार, २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. या घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर उर्वरित ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here