सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने (CISF) एक अधिसूचना जारी करुन बंपर पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. अधिसूचनेनुसार, Central Industrial Security Force मध्ये 451 काॅन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होईल. 23 जानेवारी 2023 पासून उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करु शकतील. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाईट WWW.cisfrectt.in द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
( हेही वाचा: गिफ्ट हॅम्परच्या नावाखाली जुन्या वस्तू? होणार कारवाई; 1 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू )
CISF Recruitment 2023: रिक्त जागा किती?
अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भारती मोहिम आयोजित केली जात आहे. त्यापैकी 183 रिक्त जागा काॅन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा काॅन्स्टेबल/ ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी आहेत.
CISF Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
CISF Recruitment 2023: वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे.
CISF Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख
रिक्त जागांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 22 फेब्रुवारीपूर्वी अर्ज करावा लागेल.
Join Our WhatsApp Community