-
ऋजुता लुकतुके
आपल्या सी३ ते सी५ या सी सीरिजनंतर सिट्रॉन कंपनी भारतात बेसाल्ट हे नवीन कूप मॉडेल घेऊन बाजारात आली आहे. यू, प्लस आणि मॅक्स अशा तीन प्रकारात बेसाल्ट गाडी तुम्हाला मिळणार आहे. ४ मीटरच्या आत लांबी असलेली ही छोटी एसयुव्ही गाडी असून तिची किंमत ८ लाख रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. ही सुरुवातीची किंमत असून नोव्हेंबर २०२४ नंतर गाडीची किंमत वाढणार आहे. (Citroen Basalt)
(हेही वाचा- एसएसएलव्ही-डी 3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल PM Narendra Modi यांनी इस्रोचे केले अभिनंदन)
महेंद्रसिंग धोणी हा सिट्रॉन कारचा ब्रँड अँबेसिडर आहे. आणि गाडीची पहिली जाहिरात त्याच्यावरच चित्रित करण्यात आली आहे. धोणी ही मजबूत कार रस्त्यावरून थेट जंगलात आणि पाण्यात नेताना आपल्याला या जाहिरातीत दिसतो. सिट्रॉन सी३ आणि सी३ एअरक्रॉस या श्रेणीतील ही कार असून अलीकडेच ती शोरुममध्येही दिसायला लागली आहे. (Citroen Basalt)
Time to do The Unthinkable, from behind the wheel!
Drive home the Citroën Basalt now!
Bookings Open Introductory price starts at ₹7.99 lakh*. #CitroënBasalt #TheUnthinkable #SUVCoupe #CitroënIndia pic.twitter.com/ivtkB0yIHD
— Citroën India (@CitroenIndia) August 14, 2024
बेसाल्ट गाडी सध्या स्टील ग्रे, प्लॅटिनम ग्रे, कॉस्मो ब्लू, पोलार व्हाईट आणि गार्नेट रेड या पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. गाडीचं छत हे काळ्या रंगाचं असेल. गाडी बाहेरून सी३ एअरक्रॉसच्या डिझाईनवर बेतलेली आहे. ५ जणांची आसन क्षमता असलेली ही गाडी आतून अत्याधुनिक आहे. चालकाच्या समोर ७ इंचांचा डिजिटल डिस्प्ले असेल. तर मनोरंजनासाठी १०.५ इंचांचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कारप्लेचा वापर यात तुम्ही करू शकता. (Citroen Basalt)
(हेही वाचा- Electric Cremation: ‘रे रोड’ येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तांत्रिकी दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद)
ही गाडी १.२ पेट्रोल आणि टर्बो इंजिन असलेली गाडी असेल. ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली ही गाडी इंजिनातून ८२ एचपी शक्ती निर्माण करू शकेल. साधारण १८.५ किमी एका लीटरमागे अशी सरासरी या गाडीची असेल. या गाडीचं बुकिंग आणि विक्री दोन्ही सुरू झाली आहे. (Citroen Basalt)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community