पप्पा वेळ देत नाहीत; तक्रार करणाऱ्या मुलींसाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतला अनोखा निर्णय

भारताचे सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड न्यायालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबाला विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुलींना पुरेसा वेळ देत नाहीत, अशी तक्रार स्वतः त्यांच्या दोन मुलींनी केली. त्यामुळे त्यांनी अखेर त्या दोन्ही मुलींना शब्दांत न समजावत अनोखा निर्णय घेतला.

आणि मुलींना उत्तर मिळाले

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अखेर त्यांच्या दोन्ही मुलींना थेट न्यायालयात सोबत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी माही आणि प्रियंका या दोन मुलींना शुक्रवारी, ६ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात आणले. न्यायमूर्ती चंद्रचूड सकाळी 10 च्या सुमारास न्यायालयाच्या आवारात पोहोचले. मुलींना त्यांनी नियम पाळत व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या कोर्टरूममध्ये घेऊन गेले. ‘बघा, मी इथे बसतो’, असे ते मुलींना म्हणाले. यानंतर चेंबरमध्ये नेले आणि त्यांना न्यायाधीश बसतात आणि वकील त्यांची बाजू मांडतात ती जागा दाखवली. विविध प्रशासकीय बाबींवर सरन्यायाधीशांकडून सूचना घेण्यासाठी निबंधकांची फौज तिथे सरन्यायाधीशांची वाट पाहत उभी होती. ते पाहून माही आणि प्रियंकाला आश्चर्याचा धक्का बसला. न्यायालयात मुलींना आणल्यावर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना जेव्हा व्हील चेअरवर बसवले तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या दोन्ही मुली दिव्यांग आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड साध्या वेशात होते. मुलींना आता पप्पा वेळ का देत नाहीत, याचे उत्तर मिळाले. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना यांनी माही आणि प्रियंकाला दत्तक घेतलेले आहे. सरन्यायाधीश पदावर धनंजय चंद्रचूड हे दोन वर्षांसाठी असणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त ते होतील.

(हेही वाचा देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; देशपातळीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here