सरन्यायाधीश यू यू लळीत यांनी आज, मंगळवारी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून सरकारला पाठवले आहे. न्यायमूर्ती यू यू लळीत हे पुढच्या महिन्यात 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून त्याच्या नावाची शिफारस केली आहे.
(हेही वाचा – PFI नंतर NIA चा काश्मिरमध्ये मोर्चा, टेरर फंडिंग प्रकरणी अनेक ठिकाणांवर छापे)
सरन्यायाधीश यू यू लळीत यांनी मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना जजेस लाऊंजमध्ये आमंत्रित केले आहे. यामध्ये त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती मिळतेय. तर केंद्र सरकारच्या वतीने कायदा मंत्रालयाने सरन्यायाधीश यू यू लळीत यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस पाठवण्याची विनंती केली होती. जेष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूज हे सध्याचे मुख्य न्यायाधीश लळीत यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आहेत. म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश होणार असल्याचे म्हटले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1579706707374411777?s=20&t=W2s7KID9i3qVlji26AY0iQ
सरन्यायाधीश यू यू लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाल केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे. ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ असल्याने त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांचा असणार आहे.
Join Our WhatsApp Community