परिचारिकांपाठोपाठ ‘हा’ वर्गही बेमुदत आंदोलनाच्या पावित्र्यात!

156

राज्यातील आरोग्य क्षेत्रातील कंत्राटीकरण नियुक्त्यांवर परिचारिकांनी बेमुदत संप पुकारलेला असताना आता चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कंत्राटीऐवजी कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांच्या नियुक्त्या करा, अशी मागणी करण्यासाठी जे.जेत आज शुक्रवारी दुपारी कर्मचा-यांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची झळ लवकरच राज्यभरात दिसून येईल, असा इशाराही यावेळी दिला गेला.

(हेही वाचा – विनाकारण हॉर्न वाजवणं पडणार महागात; मुंबई पोलीस राबवणार ‘ही’ अनोखी मोहीम)

कंत्राटीपद्धतीने नोकरीचे भवितव्य अंधारात

सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठीही कंत्राटी पद्धतीचा अवबंल केला जाईल. १३ एप्रिल रोजी सरकारी अध्यादेशातून कंत्राटी पद्धतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील नियुक्त्या केल्या जातील, असे जाहीर करण्यात आले. तृतीय श्रेणीत परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील ब-यापैकी लिपीकवर्ग मोडतो. कंत्राटीपद्धतीने नोकरीचे भवितव्य अंधारात येईल, अशी माहिती जेजेतील कर्मचा-यांनी ठिय्या आंदोलनाच्यावेळी दिली.

जूनमध्ये ६ ते ८ जूनदरम्यान काम बंद आंदोलन

कोरोना काळात आमच्याकडून रुग्णसेवा देताना कोणतीही कमतरता राहिली नाही, सरकारने अक्षरशः आम्हाला वापरले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर आमचा विसर पडला, ही उद्विग्न भावना कर्मचा-यांनी आंदोलनात व्यक्त केली. आजचे केवळ एक तासापुरते आंदोलन होते. येत्या जून महिन्यात ६ ते ८ जूनदरम्यान सकाळी ८ ते १० दरम्यान काम बंद आंदोलन होईल. सरकारी पातळीवर आमची दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचा-यांनी दिला. संपाचे हे लोण राज्यभरात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांकडून पसरेल, असा सूचक इशाराही कर्मचा-यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.