गिरगाव चौपाटीची स्वच्छता नौदल ‘काश’ कॉलेज विद्यार्थ्यांसह करेल!

94

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून ‘काश’ फाउंडेशन’ आणि भारतीय तटरक्षक दल (नौदल) यांच्या सहकार्याने गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम येत्या शनिवारी राबवली जाणार आहे. शनिवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत हा स्वच्छता मोहिमेचा राबवला जाणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. या स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने काश फाऊंडेशन पदाधिकारी व स्वयंसेवक आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव चौपाटीची पाहणी केली.

(हेही वाचा – संघाच्या गणवेशाला आग लावून रावणाला स्वतःची लंका जाळायची आहे का?)

१७ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीन-अप दिनाचा एक भाग म्हणून, भारतीय तटरक्षक दल पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या घोषणेसह उपक्रम राबविते. सागरी पर्यावरणाचे पुढील प्रदूषण टाळण्यासाठी स्थानिक जनतेला शिक्षित आणि प्रेरित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

जागतिक कचरा समस्येचा सामना करण्यासाठी आणि एक शाश्वत जग निर्माण करत हा दिवस साजरा करण्याचा संस्थेचा मानस असून म्हणुनच भारतीय तटरक्षक दल यांच्या सहकार्याने गिरगाव चौपाटी, मुंबई येथे बीच क्लीनअप ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी ०७:३० – १०:०० असे सुमारे तीन तास हा उपक्रम असणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. या दिवशी देशातील ७५ चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून मुंबईतील जुहू आणि गिरगाव या दोन चौपाटीचा समावेश आहे. त्यातील गिरगाव चौपाटीवर काश’ फाउंडेशन’ आणि भारतीय तटरक्षक दल (नौदल)यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

“पर्यावरण वाचले तरच जग वाचेल” या घोषवाक्याचे तंतोतंत पालन करत ‘काश’ फाउंडेशन, हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी सतत उपक्रम राबवत आले आहे. ग्लोबल वेस्ट क्लीनिंग नेटवर्क, इंग्लंड, युनायटेड किंगडमचे प्रमाणित सदस्य असलेले काश फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, ऐतिहासिक वारसा व पर्यावरण या चार क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे.

‘काश’ फाऊंडेशन चे संस्थापक व डायरेक्टर डॉ.अवकाश जाधव हे स्वतः पर्यावरण प्रेमी असून त्यांनी फाऊंडेशन मार्फत आरे जंगल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, खारफुटी अश्या अनेक मुद्द्यांवर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मोहीम राबवली आहे.
“सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी व युवा पिढीमध्ये जनजागृती व पर्यावरण प्रेम निर्माण करण्यासाठी हा उपक्रम एक उत्तम साधन ठरेल” अशी आशा डॉ. अवकाश जाधव यांनी व्यक्त केली.गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता मोहिमेसाठी स्वयंसेवक व नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी अशी मानवी साखळी यावेळी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसाची सुरुवात ओशन कंझर्व्हसीने केली होती – ही एक संस्था जी समुद्राचे दरवर्षी येणाऱ्या आव्हानांपासून संरक्षण करण्यास मदत करते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.