हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अमरनाथ पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ६ जुलैपासून काश्मीर घाटीत हवामान खात्याने अलर्ट जारी केला होता. तसेच ३० जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेच्या मार्गावर एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या होत्या. या यात्रेसाठी जवळपास १० ते १२ हजार अमरनाथमध्ये दाखल झाले होते. तीन लंगर आणि परिसरातील तंबू पाण्याच्या जोरदार वाहून गेले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported at around 5.30 pm. Rescue operation underway by NDRF, SDRF & other associated agencies. Further details awaited: Joint Police Control Room, Pahalgam
(Source: ITBP) pic.twitter.com/AEBgkWgsNp
— ANI (@ANI) July 8, 2022