धुलिवंदन सण ‘नैसर्गिक’ रंगांचा वापर करून साजरा करावा; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : Happy Holi : कुठे रॉयल…तर कुठे फुलांची; देशभरातील होळीचे विविध रंग! )

मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “होळीचा हा पारंपरिक सण आपल्याला निसर्गाकडे घेऊन जातो. या सणातून पिढ्यान् पिढ्यांना पर्यावरणाचे जतन-संवर्धनाची शिकवण दिली जाते. यंदाही या सणांमधून आपल्यामध्ये जागरुकता वाढीस लागणाऱ्या उपक्रमांचे आयोजन व्हावे. तसेच धुलिवंदनात प्रामुख्याने रंगांची उधळण होते. हे रंग आपल्याला निसर्गाकडेच घेऊन जातात. या रंगांप्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परस्पर स्नेह-प्रेमांच्या रंगांची बहार निर्माण व्हावी.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here