#Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

120
  • एक महिन्याने मी आपल्याला भेटत आहे.
  • एक महिन्यानंतर आपण कुठे आहोत, काय केले पाहिजे, हे सांगण्यासाठी मी आलो आहे.
  • आपण जी बंधने पाळत आहात त्याचा परिणाम आज दिसत आहे.
  • तौक्ते वादळ आपल्या किनारपट्टीला स्पर्श करुन गेले.
  • गेल्या वर्षी निर्सग आले. ही अशी वादळं आता दरवर्षी येऊ लागली आहेत.
  • आपल्या प्रशासनाने चांगले काम केले आहे.
  • मी रत्नागिरी सिंधुदुर्ग ला जाऊन आलो.
  • होय मी धावता दौरा केला.
  • मी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा नुकसान किती झाले याची पाहणी केली.
  • मधल्या काळात पंतप्रधानांसोबत बैठक झाली.
  • केंद्राचे काही निकष आहेत ते आता बदलायला हवेत, अशी मी विनंती करत आहे.
  • लोकांवर नाईलाजाने आपल्याला बंधने घालावी लागत आहेत.
  • अजूनही आपण खाली आलेलो नाही.
  • आज आकडेवारी खाली आलेली आहे.
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे.
  • मृत्यूदर 1.62 टक्के इतका आहे.
  • आता आपण निर्बंध लावत आहोत, कडक लॉकडाऊन लावत नाही.
  • काही जिल्ह्यांत रुग्ण संख्या वाढत आहे.
  • शहरी भागात रुग्ण संख्या कमी होत आहे.
  • तिसरी लाट ही आपल्याला तारीख सांगून येणार नाही.
  • म्युकरमायकोसीसचे आपल्या राज्यात 3 हजार रुग्ण आहेत.
  • या सर्व गोष्टी आपण डॉक्टरना सांगत आहोत.
  • आपण माझा डॉक्टर ही संकल्पना राबवली आहे.
  • डॉक्टरांशी संवाद मी साधला.
  • या सर्वांना मी आवाहन केले आहे त्यांनी प्रतिसाद देखील दिला आहे.
  • तिसरी लाट ही कदाचित बालकांसाठी धोकादायक असू शकते.
  • बालकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते.
  • आपल्यामुळे लहान मुलांना संसर्ग होऊ नये, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
  • 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आहेत.
  • जसा हा पुरवठा वाढेल, तशी प्रक्रिया देखील आपण वाढवू.
  • लसीकरणासाठी लागणारी लस आणि त्याची उत्पादन क्षमता वाढायला हवी.
  • 12वी च्या परीक्षांबाबत आपण आढावा घेत आहोत.
  • केंद्राने देखील याबाबतीत एक धोरण ठरवायला हवे.
  • शैक्षणिक धोरण हे केंद्राने ठरवायला हवे.
  • ते सर्व राज्यांसाठी समान असायला हवे.
  • शिक्षणाच्या बाबतीत काही तरी धोरण आखायला हवे.
  • शिक्षण सुरू राहिले पाहिजे त्यासाठी क्रांतिकारक निर्णय घ्यावे लागतील.
  • मी या आठवड्यात उद्योगपतींशी चर्चा करणार आहे.
  • आपल्याला सर्व काही हळूहळू उघडले पाहिजे.
  • आपल्याला कोविडवर मात करायची आहे.
  • कोरोनामुक्त गाव करायला पाहिजे.
  • गावात कोरोनाला थारा द्यायचा नाही. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.