मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मानदुखीचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर आज सकाळी साडेसात वाजेदरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया साधारण तासभर सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्व्हायकल आणि स्पायनल कॉडमध्ये त्रास होत असल्याची त्यांची तक्रार होती. उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. असे असले तरी पुढील काही दिवस त्यांना काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

…म्हणून करण्यात आली शस्त्रक्रिया

बुधवारी संध्याकाळी गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांना दाखल केल्यानंतर त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र गुरुवारी डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. अशी माहिती आहे की, गुरुवारी सायंकाळी या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यावरून वरिष्ठ डॉक्टर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्यात आला होता. मात्र ही सर्व्हायकल आणि स्पायनल कॉड शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांना डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे आज सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

(हेही वाचा – ‘विकास’ कामांचा भार मुख्यमंत्र्यांच्या मानेवर, म्हणाले…)

एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एच.एन. रिलायन्स रूग्णालयात असणारे डॉ अजित देसाई हे ह्रदयरोग तज्ज्ञ असून डॉ शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here