मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास; दोन दिवसांत होणार शस्त्रक्रिया!

70

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. तसेच उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एच.एन.रिलायन्समध्ये होणार शस्त्रक्रिया 

मिळालेल्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. तर डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे कळतंय. उद्धव ठाकरे हे मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रासाने त्रस्त असल्याने सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान, त्यांच्या काही शारीरिक चाचण्या करण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा- पगाराच्या आंदोलनात ‘नोकरी’ही गेली; राज्यात ‘या’ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित)

काही दिवस रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

असेही सांगितले जात आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणे देखील टाळले होते. सध्या उद्धव ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.